Saturday, July 27, 2024

अनोखे अभिवादन! चित्रकाराने भाकरीवर शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटून कलेच्या माध्यमातून केले अभिवादन

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ जेजे आर्ट ऑफ कॉलेजचा विद्यार्थी

नांदेड– येथील एका तरुण चित्रकाराने छत्रपती शिवाजी महाराजांना आज जयंती निमित्ताने अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.

कैलास खानजोडे या जेजे आर्ट ऑफ कॉलेज, मुंबईच्या विद्यार्थ्याने भाकरीवर महाराजांचं चित्र रेखाटून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं राजेंना अभिवादन केल आहे. हा चित्रकार अनेक वर्षांपासून नवनविन कलाआविष्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करीत असतो. नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी बसून हा चित्रकार आपले चित्र रेखाटत आहे.

भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या बापाची लेकरं, शेतकऱ्याची लेकरं म्हणून आपण भाकरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच चित्र काढून अभिवादन करत असल्याची भावना कैलास खानजोडे यांनी यावेळी व्यक्त केली. कैलास खानजोडे यांनी काढलेले चित्र पाहण्यासाठी शिवप्रेमीं मोठी गर्दी करीत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!