Saturday, July 27, 2024

नांदेडमधील यात्रेकरूंच्या कारला उत्तर भारतात भीषण अपघात; महंत त्यागीनंद महाराजांसह दोन जण ठार, दोन जण जखमी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड (प्रल्हाद कांबळे)- पुणेगाव तालुका नांदेड येथील परमानंद कुटिया मंदिराचे महंत निष्काम योगी त्यागीनंद महाराज आणि पुणेगाव येथील काही भाविक उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये दर्शनासाठी जात होते. त्यांच्या कारला मध्यप्रदेशमधील कटनी येथे भीषण अपघात झाला. हा अपघात आज शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास झाला. घटनेची माहिती पुणेगाव येथे कळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे.

दर्शनासाठी जाणाऱ्यामध्ये महंत त्यागीनंद महाराज (वय ५२),  बळीराम विक्रम पूयड (वय ४८), दत्ता नागोराव पूयड, बालाजी जाधव माळकवठेकर, रामचंद्र पांचाळ, माधव पांचाळ, रतनकुमार आणि कारचालक संभाजी बालाजी जाधव यांचा समावेश आहे.

या भीषण अपघातात महंत त्यागीनंद महाराज आणि बळीराम पूयड यांचा जागीच मृत्यू झाला. तर रतनकुमार किरकोळ जखमी झाला आहे. अपघात झालेल्या कारचा क्रमांक (एमएच २६ एके ७१३३) असा असून कारचालक संभाजी जाधव किरकोळ जखमी झाला आहे. उत्तरीय तपासणीनंतर दोन्ही मृतदेह आज रात्री उशिरापर्यंत पुणेगाव येथे आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!