ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ आज संध्याकाळी साडेसात वाजता शपथविधी
मुंबई– उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवनात पत्रकार परिषद घेऊन ही मोठी घोषणा केली.
देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक घोषणा केली. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून आज संध्याकाळी साडेसात वाजता शपथ घेणार आहेत. फडणवीस आणि शिंदे हे आज दुपारी राजभवनावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटले. अनेकांना असेच वाटत होते की फडणवीस हे मुख्यमंत्री आणि शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील. प्रत्यक्षात उलटे घडले असून शिंदे हे मुख्यमंत्री होणार आहेत. फडणवीस हे सरकारबाहेर राहणार आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
