Tuesday, November 5, 2024

नांदेडमध्ये आज कोरोना रुग्णसंख्या पुन्हा 700 पार ! 720 नवे रुग्ण तर 527 रुग्ण झाले बरे !

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर आणि जिल्ह्यात कोरोना आज गुरूवारीही रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ झाली असून आजही आकडा 700 पार गेला आहे. आज एकुण 720 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

आज एकूण 2234 टेस्टिंग पैकी 720 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 448 आहे. आज 527 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज 1 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 234 अहवालापैकी 720 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 614 तर अँटिजेन तपासणीद्वारे 106 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 96 हजार 133 एवढी झाली असून यातील 89 हजार 901 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 3 हजार 575 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे पिमप्रला हिंगोली येथील 84 वर्षे वयाच्या महिलेचा 19 जानेवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 657 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 430, नांदेड ग्रामीण 53, भोकर 2, देगलूर 26, धर्माबाद 1, कंधार 2, हदगाव 1, लोहा 12, मुदखेड 1, मुखेड 12, नायगाव 10, हिमायतनगर 4, बिलोली 1, माहूर 1, अर्धापूर 12, परभणी 13, हिंगोली 8, लातूर 4, उमरखेड 1, हैद्राबाद 5, जालना 1, जळगाव 1, आदिलाबाद 3, औरंगाबाद 2, केरळ 1, नाशिक 1, निजामाबाद 2, उस्मानाबाद 1, कर्नाटक 1, तेलंगणा 2 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 18, नांदेड ग्रामीण 2, बिलोली 24, धर्माबाद 28, हदगाव 3, लोहा 1, माहूर 5, मुखेड 6, नायगाव 10, उमरी 9 असे एकूण 720 कोरोना बाधित आढळले आहे.

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 463, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 50, खाजगी रुग्णालय 3, जिल्हा रुग्णालय कोविड  हॉस्पिटल नांदेड 2 असे एकुण 527 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 28, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 708, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 807, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 22, बिलोली कोविड रुग्णालय 2 असे एकुण 3 हजार 575 व्यक्ती उपचार घेत आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 25 हजार828

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 15 हजार 154

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 96 हजार 133

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 89 हजार 901

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 657

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.51 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-14

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-57

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3 हजार 575

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!