Saturday, July 27, 2024

विचित्र अपघातात मोटारसायकल थेट ऑटोत वरून घुसली, मुखेड- नरसी मार्गावर ३ जण जखमी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मुखेड (जि. नांदेड)- तालुक्यातील सलगरा बु. येथील इंदभारत कंपनीजवळ राज्यमार्गावर भरधाव वेगातील मोटारसायकल व ऑटोची समोरासमोर धडक झाल्याने मोटारसायकलस्वार दोन युवक व ऑटोचालक जखमी झाले. ही धडक इतकी जबर होती की, मोटारसायकल थेट अॅटोच्या वरून मधोमध जाऊन घुसली. जखमींना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

मुखेडहून नरसीकडे जाणारी मोटारसायकल (क्र. एम.एच.२६ बीव्ही ०३७२) व नरसीमार्गाहून मुखेडकडे येणारा ऑटो क्र. (ए.पी.२३ वाय ०२५९) ची समोरासमोर धडक झाली. यात ऑटोचालक व मोटारसायकल वरील रवी माधव मुद्देवाड (वय २४) रा.मुखेड व प्रशांत अशोक कडमपल्ले (वय १७) रा. मुखेड हे दोन युवक जखमी झाले. जखमींना उपजिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!